डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य बोरकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी - ०४/०४/२५ महाराष्ट्रातील विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी "मुकेश भाई निकाळजे मित्र मंडळ, जालना" यांच्या वतीने समाजरत्न पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथील विद्यार्थी आदित्य राजकुमार बोरकर यांना लेखक तसेच युवा व्याख्याता म्हणून दिलेल्या योगदानासाठी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिक्षक विठ्ठल कांगणे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. प्रत्येक जिल्ह्यातून दोन युवकांची निवड करून हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल, प्रमाणपत्र असे होते.
आदित्य बोरकर यांनी आपल्या लेखन आणि व्याख्यानाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि समता यावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठित समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल आदित्य बोरकर यांनी आयोजक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद आणि कुटुंबीयांचे आभार मानले व सामाजिक कार्यासाठी आपल्या लेखणीतून आणि व्याख्यानातून योगदान देत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
त्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे.