तन - मन लावून संशोधन करणे गरजेचे. - डॉ.धनराज खानोरकर
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी - १७/०४/२५" संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.संशोधन अनेक पातळ्यांवर केले जाते.संशोधक विद्यार्थ्यांनी संबंधित विषयाची फोड करुन नवे नवनित,नवा विचार मांडायचा असतो त्यामुळे संशोधन हे तन-मन लावून करावे लागते " असे मार्मिक विवेचन ने.हि. महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. धनराज खानोरकरांनी केले.ते स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये ' संशोधनाच्या दिशा' विषयावर बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मराठी विभागप्रमुख डॉ.जगदीश मेश्राम यांनी विद्यार्थ्यांच्या संशोधनाविषयी विविध विषयाला स्पर्श केला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा.के.एस.मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विभागातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.