१४,१५,१६,एप्रिलला ब्रम्हपुरीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा १३४ वा जयंती सोहळा : मान्यवर वक्त्यांची उपस्थिती.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१०/०४/२५ येथील सार्वजनिक जयंती उत्सव समिती, ब्रम्हपुरीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती सोहळा दिनांक १४, १५ व १६ एप्रिल २०२५ ला पंचशील एज्युकेशन सोसायटीचे प्रांगणात बॅरी.खोब्रागडे चौक, ब्रम्हपुरी येथे आयोजित केला आहे.
दिनांक १४ एप्रिलला सकाळी ठीक ९.००वा.समता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून ही रॅली पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणातून दुचाकी,चारचाकी वाहनाने निघून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर करेल.
विशेष म्हणजे १५एप्रिल २०२५ ला सायंकाळी ६.०० वा. पंचशिल एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडणार आहे.यात अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातले प्रसिद्ध विचारवंत व 'उपरा' कार साहित्यिक लक्ष्मण माने अध्यक्षस्थानी असतील.यावेळी दिल्ली विद्यापीठाचे माजी प्रोफेसर, प्रसिद्ध लेखक डॉ लक्ष्मण यादव प्रमुख वक्ते म्हणून आपले विचार मांडतील. समितीचे अध्यक्ष प्रास्ताविकातून समितीची वाटचाल विशद करणार आहेत.१६ एप्रिलला भीमराज की बेटी,झी .टी.व्ही.सारेगम फेम अँड.रागीनी बोदडे यांचा संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.
या तीन दिवसीय कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समितीध्यक्ष अशोक रामटेके, उपाध्यक्ष सुधीर अलोने,सचिव डॉ युवराज मेश्राम,सहसचिव सुधाकर पोपटे,कोषाध्यक्ष के.जी. खोब्रागडे, संघटक नेताजी मेश्राम, महिला संघटक छायाताई जांभुळे इत्यादिंनी केले आहे.