विद्यापीठ स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संविधान अवताडे प्रथम,पूजा विर द्वितीय,योगेश सिडाम तृतीय.

विद्यापीठ स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संविधान अवताडे प्रथम,पूजा विर द्वितीय,योगेश सिडाम तृतीय.

 

अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,१३/०४/२५महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रह्मपुरी येथील आंबेडकर विचारधारा विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ भारतीय लोकशाहीचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर विद्यापीठ स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. 



या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित एन.एच. कॉलेज ब्रह्मपुरी, कर्मवीर महाविद्यालय मूल, गोविंदराव वारजुकर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागभिड, गंगाबाई तलमले कॉलेज ब्रह्मपुरी, जनता महाविद्यालय चंद्रपूर, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार रात्र पाळी कॉलेज चंद्रपूर, कर्मवीर महाविद्यालय मूल,  आणि श्री सद्गुरु साईबाबा सायन्स अँड कॉमर्स कॉलेज आष्टी, चिंतामणी कॉलेज, घुग्घुस आणि इतर महाविद्यालयातील विद्यार्थी संघानी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला आणि आपल्या वक्तृत्व कौशल्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.


स्पर्धेचे  परिक्षण ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके,ज्येष्ठ पत्रकार विजय मुळे आणि लेफ्टनंट  सरोज शिंगाडे यांनी केले. स्पर्धकांच्या एकूण सादरीकरणाचे परीक्षकांनी बारकाईने मूल्यमापन करून विजेत्यांची निवड केली.या स्पर्धेत प्रथम क्रमांक चिंतामणी कॉलेज, घुग्घुस  येथील बी.कॉम. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी संविधान शरद अवताडे याने प्राप्त केला.  रोख रक्कम तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्याला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 


स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक सरस्वती जयरामजी तर्वेकर महिला कॉलेज, नागभिड येथील बी.ए. प्रथम वर्षाची कु. पूजा कृष्णाजी विर या विद्यार्थिनीने प्राप्त केला. रोख रक्कम दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन तिला सन्मानित करण्यात आले.स्पर्धेचे तृतीय पारितोषिक कर्मवीर महाविद्यालय, मुल येथील बी.कॉम. तृतीय वर्षाचा विद्यार्थी योगेश अरुण सिडाम यांनी प्राप्त केला.रोख राशी एक हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्याला गौरविण्यात आले. 


याशिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी येथील आदित्य राजकुमार बोरकर या विद्यार्थ्याला प्रोत्साहनपर प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.


स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा डॉ.आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. देवेश कांबळे यांनी भूषविले.यावेळी त्यांनी आपल्या संभाषणात विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचे कौतुक केले. 


आणि अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी एक विचारमंच मिळते आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांना प्रोत्साहन मिळते असे भाष्य करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाही संदर्भातील  विचार आणि आजच्या काळातील त्याचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धेच्या परिक्षक लेफ्टनंट सरोज शिंगाडे यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व गुणावर भाष्य केले. 


कार्यक्रमाचे संचालन व आभार विद्यार्थी विकास विभाग तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी केले.स्पर्धा आयोजन समिती तथा महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद यांनी या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले. ब्रम्हपुरी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या रिमा कांबळे यांनी विशेष सहकार्य केले. या स्पर्धेच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !