मुल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे खासदार प्रतिभाताई धानोरकर लेखी निवेदन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल तालुक्यात काँग्रेस नेते व सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात सर्वाधिक ग्राम पंचायती निवडून आल्या असून या ग्रामपंचायतींना शासकीय निधी देताना मात्र सत्ताधारी पक्षाकडून भेदभाव केल्याजात असल्याने गावात विकास कामे होत नसल्याने ग्राम पंचायतीचे सरपंच व ग्रामस्थ सत्तापक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.यासाठी काँग्रेस प्रणित ग्राम पंचायतींना शासनाकडून व स्थानिक विकास निधी आणि खनिज विकास निधी उपलब्ध करुण द्यावे.
अशा मागणीचे निवेदन १४ एप्रिल २०२५ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर लेखी निवेदन देण्यात आले. तसेच तालुका स्तरावर सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलवावी अशी विनंती सुद्धा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करतांना केली.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे महासचिव व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार,माजी सभापती तथा जिल्हा काँग्रेस महासचिव, व संचालक घनश्याम येनुरकर, तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष नलिनी आडपवार,सचिव शामला बेलसरे, उपाध्यक्षा समता बनसोड, एड.हिमानी वाकुडकर उपस्थित होते.