नॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये भिकारी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट शाॅर्ट फिल्म पुरस्कार प्राप्त. 📍ब्रह्मपुरी च्या शिरपेचात सन्मानाचा तुरा. - कवी रोशन पिल्लेवान पिंपळगाव (भोसले)

नॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये भिकारी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट शाॅर्ट फिल्म पुरस्कार प्राप्त.


📍ब्रह्मपुरी च्या शिरपेचात सन्मानाचा तुरा. - कवी रोशन पिल्लेवान पिंपळगाव (भोसले) 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापूर येथील रहिवासी असलेले संत कबीर फिल्म प्रोडक्शन्स, नागपूर चे  चित्रपट दिग्दर्शक व लेखक तसेच विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंकेचे कर्मचारी आशिष अशोक नागदेवते दिग्दर्शित भिकारी या लघू चित्रपटाला नुकतेच कोल्हापूर येथे झालेल्या नॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट शाॅर्ट फिल्म पुरस्कार प्राप्त झाला.  


या  चित्रपटातील अभिनेते तथा सुप्रसिद्ध साहित्यिक रोशनकुमार पिलेवान यांनी हा पुरस्कार स्विकारला. सदर फिल्म फेस्टिवल मध्ये एकूण 220 चित्रपटांनी सहभाग नोंदविला होता. चित्रपटाचा आशय, विषय आणि दर्जा बघता भिकारी या लघु चित्रपटाला सर्वोत्कृष्ट शाॅर्ट फिल्म पुरस्कार प्राप्त झाला. जेष्ठ निर्माते आणि साहित्यिक डॉ.रमेश विवेकी आणि अंतिमा कोल्हापूरकर यांच्या हस्ते पुरस्कार बहाल करण्यात आला.

      

भिकारी हा चित्रपट समाजातील वास्तवीक प्रश्नांवर आधारित असून तो समाजाला प्रेरणादायी ठरणारा आहे. चित्रपटाचे गीत मुळचे ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो) येथील सुप्रसिद्ध लेखक व कवी रोशनकुमार पिलेवान यांनी लिहिलेले असून त्याद्वारे समाजाची वास्तविकता दर्शविली आहे. नुकतेच या चित्रपटाला बेस्ट दिग्दर्शक आशिष नागदेवते व 


अभिनेते सुरेंद्र मेश्राम यांना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला होता. त्यांच्या या यशाबद्दल विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंकेचे कर्मचारी,चित्रपट दिग्दर्शक नागेश वाहुरवाघ,अभिनेते सुरेंद्र मेश्राम,लेखक रोशनकुमार पिलेवान तसेच संत कबीर फिल्म प्रोडक्शनचे सदस्य, नातेवाईक व मित्रमंडळींनी शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !