डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : 14 एप्रिल 2025 ला नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मुल येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ह्या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर उपस्थित होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ट शिक्षक गुरदास चाैधरी,प्रा.महेश पानसे , प्रा. किसनराव वासाडे,प्रा.पुस्ताेडे,प्रा.विजय काटकर,शिक्षक श्री.राजू बाेढे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन तथा द्वीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर श्री विजय मेश्राम आणि पूनमचंद वाळके यांनी बाबासाहेबांच्या जीवनचारित्रावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनंतर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर यांनी स्वरचित कविता घटनाकार सादर केली.तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक कार्य व त्यांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश माथनकर यांनी तर आभार प्रदर्शन विकास मोडक यांनी केले.याप्रसंगी विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील ,प्राध्यापक,शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.