अ-हेरनवरगांव येथे श्रीमद् ज्ञानयज्ञ रहस्य ग्रामगीता तत्वज्ञान रहस्य हरिनाम सप्ताहाची सांगता.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१७/०४/२५ ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगांव येथील हनुमान मंदीर देवस्थान येथे ०९ एप्रिल पासून सुरू झालेल्या श्रीमद् ज्ञानयज्ञ रहस्य ग्रामगीता तत्वज्ञान रहस्य हरिनाम सप्ताहाची सांगता दि.१५ एप्रिल २५ ला भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात गोपाल काला फोडून झाली.
यावेळी गोपाल काला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तलाठी संजय मटाले,बिट जमादार अरुण पिसे,माजी सैनिक सुभाष ठेंगरे,प्रा.प्रशांत राऊत पत्रकार दै.नवराष्ट्र, अमरदीप लोखंडे ,ग्रा.पं.सरपंचा सौ दामिनी चौधरी, ग्रा.पं. सदस्य श्रीकांत पिलारे,व गावकरी मंडळी उपस्थित होते.गेल्या शेकळो वर्षांपासून हनुमान मंदिर कमेटी भागवत सप्ताहाचे आयोजन करून प्रवचनातून समाज जागृतीचे कार्य करीत असते.
या प्रसंगी सु.श्री.साध्वी दिलाशा मेगशाम ठलाल यांनी दि.०९एप्रिल ते १५ एप्रिल २५ दरम्यान आपल्या अमृत्यूल्य वाणीतून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी गाडगेबाबा यांचे कृतिशील विचार,भारत मातेला वंदन,प्रभू श्रीराम,भगवान श्रीकृष्ण
शिवपुराण कथा आपल्या भागवत प्रवचनाच्या माध्यमातून उदाहरणांसह सांगितले तर दैनंदिन कार्यक्रमात हरिपाठ,सामुदायिक प्रार्थना,भगवत गीता प्रवचन,महाबली हनुमान प्रवचन,व्यसनमुक्ती मार्गदर्शन व भजन कीर्तनाच्या गजरात रामधूम ,झाकी प्रदर्शन करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी गोपालकला व स्नेहभोजनाने सांगता करण्यात आली.संपूर्ण कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.