गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील ढिसाळ कारभारामुळे अनेक आजी - माजी विद्यार्थी उन्हाळी परिक्षेपासु्न वंचित.
एस.के.24 तास
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील कुलसचिव/कुलगुरू व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या गैर जिम्मेदारी मुळे व आजी - माजी विद्यार्थ्यां पर्यंत माहिती विभागीय प्रत्येक ग्रुप वर माहिती उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी असताना सुद्धा माहिती उपलब्ध न झाल्याने आजी - माजी विध्यार्थ्यांना परीक्षा फार्म भरण्याची माहिती न मिळाल्याने फार्म भरलेला नाही.
यामुळे अनेक विध्यार्थ्यांचा विद्यापीठातील कर्मचारी व प्राध्यापकांच्या निष्काळजीपणामुळे विध्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे.यावर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील कुलगुरू/कुलसचिव लक्ष केंद्रित करतील काय ? फक्त आपल्या विद्यापीठाच्या लॅपटॉप वरचं आणि इमेल वरचं विद्यापीठाचे काम चालणार विद्यापीठाने गडचिरोली जिल्हा आदिवासी जंगलाने व्यापलेला आहे याचं विसर पडलेला दिसतो.
प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती पोहचली की नाही.हे काम विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या द्वारे झालेलं नसेल तर त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.अशी मागणी विद्यापीठातील विद्यार्थी द्वारा होत आहे.