दारू न दिल्यामुळे तरुणाने वृद्ध महिलेला चाकूने भोसकुन केले जखमी.
एस.के.24 तास
तुमसर : एक महिला पान टपरीवर विश्रांती घेत होती. मध्यरात्रीच्या सुमारास एक तरुण तेथे आला आणि तिला दारूची मागणी करू लागला.महिलेले दारू नाही असे सांगताच तरुणाने रागाच्या भरात तिच्यावर चाकूने वार केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.यात ही महिला गंभीर रित्या जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तुमसर च्या सरकारी दवाखान्यासमोर असलेल्या चंद्रिकापुरे यांच्या पानठेल्यावर फिर्यादी महिला वय,56 वर्ष रात्री विश्रांती घेत होत्या.12:00 वाजताच्या सुमारास अविनाश दिलीप भोंडे वय,18 वर्ष रा.शिवाजी नगर, तुमसर हा तरुण तेथे आला.
त्याने फिर्यादी महिलेला दारूची मागणी केली. मात्र महिलेने दारू नसल्याचे सांगितले.रागाच्या भरात या तरुणाने चाकूने महिलेवर वार करून तिला जखमी केले.