विविध प्रमाणपत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.
📍उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील व तहसीलदार सतीश मासाळ यांची उपस्थिती.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : ०५/०४/२५ ब्रह्मपुरी तालुक्यातील व मुख्यालयापासुन २५किलोमिटर अंतरावर असलेल्या व भटक्या जमाती यांचे १५ कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या मौजा गणेशपुर व पातळी गोपाळ पुरी या गावात संबंधितांना जात प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र वितरित करण्याकरीता
मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे 100 दिवसांचे कार्यक्राअंतर्गत तहसील कार्यालय ब्रम्हपुरी चे वतीने विशेष शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक ४ मार्च ला करण्यात आले.शिबिरास उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील , तहसीलदार सतीश मासाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विविध प्रमाणपत्रांचे वितरण केले.आणि शासकीय विविध योजनांची माहिती सांगितली.
दरम्यान शिबिरात जात प्रमाणपत्र , जन्म प्रमाणपत्र वितरित करण्याकरीता अर्ज भरून घेण्यात आले. तसेच उत्पन्न प्रमाणपत्र,नवीन रेशनकार्ड चे वितरण ,आधार अपडेट व आधार संबंधीत कामे , जन धन बँक खाते तयार करणे , संजय गांधी योजना तसेच आरोग्य तपासणी शिबिरात २०९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.आणि उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरास नायब तहसीलदार आशिष तालेवार,महानंदा मडावी , लीना बोबाटे , ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी चे डॉ. श्रीकांत कामडी व अन्य वैद्यकिय चमू,भारतीय स्टेट बँक ब्रम्हपुरी विजय कुमार शर्मा व त्यांची टीम, प्राथमिक आरोग्य केंद्र मेंडकी यांची टीम, सरपंच, पोलीस पाटील,ग्राम महसूल अधिकारी घनश्याम राऊत , ग्रामसेवक मने
पुरवठा विभाग दिलीप मेश्राम, ऑपरेटर,महसूल सेवक ठवकर गांगलवाडी , आधार केंद्र चालक कुथे, सीएससी केंद्र चालक कलमगाव लिंगायत उपस्थित होते. व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक आकाश भाकरे मंडळ अधिकारी गांगलवाडी यांनी केले.