महाराष्ट्रात धन्वंतरीधाम सरकार तर्फे व्यसनाधीशास मोफत औषधी व्यसनमुक्ती अभियानास सुरुवात.

महाराष्ट्रात धन्वंतरीधाम सरकार तर्फे व्यसनाधीशास मोफत औषधी व्यसनमुक्ती अभियानास सुरुवात.


एस.के.24 तास 


धुळे : महाराष्ट्रातील गावा गावांमध्ये व्यसनमुक्तीसाठी जगात भारी धन्वंतरीधाम सरकार. डॉक्टर सुनील उदिकर महाराज. यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती अभियानास धुळे शहरातील मानस हॉटेल या ठिकाणी दिनांक 27 एप्रिल रोजी सुरुवात झाली. महाराष्ट्रातील विविध शहरातून यवतमाळ वर्धा पुलगाव भुसावळ सांगली नाशिक कोपरगाव मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी आलेली व्यसनमुक्ती अभियानात काम करणारे.कार्य कर त्यांना यावेळी अभियान संदर्भात.डॉक्टर सुनील उदिकर महाराज यांच्या मार्गदर्शकाखाली एक दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले.




यानंतर प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये व गावातील गावांमध्ये व्यसनमुक्ती बाबत प्रबोधन उपक्रम केले जाणार आहे. पुढील महिन्यात नाशिक येथून या कार्यक्रमाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला व्यसनमुक्ती मार्गदर्शन महाराष्ट्रातील कीर्तनकार ज्ञानेश्वर गोरे माऊली यांनी दिली. तसेच या ठिकाणी मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव.जावेद शेख. बळीराम जोशी. तसेच कोपरगाव मधील युसूफ शेख.पुलगाव वर्धा येथील विपुल पाटील सर यावेळी उपस्थित होते. 


तसेच व्यसनमुक्तीसाठी काम करणारे विविध मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील नागरिक दारू तंबाखू गुटखा व इतर पदार्थाचे व्यसन करतात त्यातून आरोग्याच्या समस्या व सामाजिक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे श्रीधरवंतरीधाम सरकार डॉक्टर सुनील उद्दीकर महाराज यांनी व्यसनमुक्ती साठी मोफत औषधी व्यसनमुक्तीसाठी देण्यात ठरविले आहे.याकरता पीआरओ प्रत्येक जिल्ह्यातील व्यसनमुक्तीसाठी प्रबोधित करण्यासाठी अभिनय राबवण्याबाबत निर्णय घेतला आहे. 


जिल्ह्यातील व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना निमंत्रित करून त्यांच्याकडून उपक्रमाबाबत सूचना घेण्यात आल्या तसेच व्यसनमुक्ती होणाऱ्या व्यसनाधीश व्यक्तीला धन्वंतरी धाम सरकार यांच्या वतीने मोफत औषध देणार आहे.


या व्यसनमुक्ती अभियान नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा असे आव्हान डॉक्टर सुनील उदिकर महाराज  धन्वंतरीधाम सरकार आश्रम धुळे यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !