वडिलांना स्वतःच्या संरक्षणाकरिता बैलबंडीच्या उभारीने मुलाच्या डोक्यावर प्रहार केला,दारुड्या मुलाचा जागीच मृत्यु.

वडिलांना स्वतःच्या संरक्षणाकरिता बैलबंडीच्या उभारीने मुलाच्या डोक्यावर प्रहार केला,दारुड्या मुलाचा जागीच मृत्यु.


एस.के.24 तास 


मुल : दारू पिऊन आईसोबत वाद घालत मारहाण करणा-या मुलाला सोडवत असताना मुलाने वडिलालाही मारहाण केल्याने वडिलांना स्वतःच्या संरक्षणाकरिता बैलबंडीच्या उधारीने मुलाच्या डोक्यावर प्रहार केला.यामध्ये मुलाचा जागीच मृत्यु झाला.


सदर घटना मुल तालुक्यातील येसगाव येथे सोमवारी रात्री 8:00.वाजता घडली.चंद्रशेखर नागेंद्र वाढई वय,35 वर्ष असे मृतक मुलाचे नांव आहे.तर नागेंद्र पांडुरंग वाढई वय,65 वर्ष असे आरोपी वडिलाचे नांव असून पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.

मुल तालुक्यातील येसगांव येथील नागेंद्र वाढई यांना 3 मुले आहे.एकाचा काही वर्षापुर्वी मृत्यु झाला.एक मुलगा कामानिमीत्य बाहेरगावी राहात आहे.तर चंद्रशेखर हा अविवाहीत होता,तो आपल्या आई - वडील सोबत राहात होता.चंद्रशेखर व्यसनाधीन होता.दररोज भांडण करीत आई - वडीलांना मारझोड करायचा. 

सोमवारी आई भेजगांव येथे आठवडी बाजार करून परत आल्यानंतर दारूच्या नशेत अंगणात झोपलेल्या चंद्रशेखरने आई सोबत भांडण करून मारझोड केली.घर पेटवुन देण्याची धमकी देत होता.वडील नागेंद्र वाढई आले.

चंद्रशेखर ला समजावण्याचा प्रयत्न केला.त्यांने वडीलांनाही मारहाण सुरू केली.जीव वाचविण्याच्या प्रयत्नात बैलबंडीच्या उभारीने चंद्रशेखरच्या डोक्यावर प्रहार करताच तो जागीच ठार झाला. घटनेनंतर आरोपी नागेंद्र वाढई यांनीच पोलीस पाटील राजु कोसरे यांच्याशी संपर्क साधुन घटनेची माहिती दिली.  


पोलीस उपअधिक्षक तथा मूल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रमोद चौघुले यांच्या मार्गदर्शनखाली नागेंद्र वाढई यांच्यावर मूल पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवये गुन्हा दाखल केला आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !