माझ्या पाठीशी पुस्तके होती पैसा नाही. - श्री.डोर्लीकर सहाय्यक पोलिस निरिक्षक ब्रम्हपुरी
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : विद्यार्थी मित्रानो जिवन खुप सुंदर आहे. ते जगता आलं पाहिजे. माझी परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असून मी प्राथमिक शिक्षक ते सहाय्यक पोलिस निरिक्षक हा माझ्या जिवनातील संघर्ष आहे. तो अतिशय खडतर होता. त्याला मी अभ्यासातून सहज व सोपा बनविला.
माझ्या घरची परिस्थिती मला शिक्षण घेण्यासारखी नव्हती. कमालीची गरिबी मी पाहिली आहे. पुस्तकं घ्यायला व फी भरायला पैसे नसतांना रोजगार हमी व तेदुंपत्ता गोळा करुन त्या पैशातून मी माझे शिक्षणपुर्ण केले. कारण मला माझे वडील ज्या परिस्थितीत जगत होते.त्या परिस्थितीत मला जगायचे नव्हते तर परिस्थिती बदलावयची होती.
तेव्हा माझ्या कडे पैसा तर मुळीच नव्हता पण माझ्या पाठीशी पुस्तके होती ती वाचून अभ्यास करुन मला माझी परिस्थिती आज बदलविता आली.ही गरिबी फक्त अभ्यासाने बदलविता येते. पुस्तके माणसाला जगण्याचा मार्ग सांगतात. असे मार्मिक विचार श्री डोर्लीकर या़ंनी आयोजित नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी राष्ट्रीय सेवा योजना समारोपीय कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचार व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डाँ शुभाष सेकोकर हे होते, तर शांताबाई भैया महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ एम एस वरभे, डाँ प्रकाश वट्टी, डाँ विवेक नागभिडकर, डाँ दर्शना उराडे व डाँ हर्षा कानफाडे उपस्थित होते.यावेळी डाँ वरभे यांनी डाँ एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण देवून उत्तम मार्गदर्शन केले तर डाँ शुभाष सेकोकर यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून विद्यार्थ्यानी आपले करियरकडे जाणीवेणे लक्ष देण्याची गरज आहे.असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डाँ.प्रकाश वट्टी यांनी केले तर आभार डाँ विवेक नागभिडकर यांनी मानले सदर कार्यक्रम हा डाँ डी एच गहाणे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत शेंडे, नयन मेश्राम, रोहिणी हजारे,शैलेश चुधरी व स्वाती कुत्तरमारे यांनी सहकार्य केले.