कापसी ते व्याहाड (बुज) रोड नागोबा मंदिर जवळ दुचाकी च्या अपघातात युवक जागीच ठार.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,19/04/2025 ला सावली पोलिस ठाण्याअंतर्गत व्याहाड खुर्द पोलिस दूरक्षेत्र परीसरातील कापसी ते व्याहाड (बुज) रोडवर नागोबा मंदिर च्या समोर रस्त्यावर सकाळी 9:30 वा.च्या दरम्यान मृतक राहुल शेंडे रा.सामदा बुज ता.सावली जि.चंद्रपूर दुचाकी क्रं.MH.34 CA 5764 तो दुचाकी ने कापसी वरून व्याहाड बुज कडे जाताना अपघात झाला.आणि तो जागीच ठार झाला.
परंतु हा अपघात कसा झाला अजुनही गुलदस्त्यात आहे. मृत्यू स्थळी सावली पोलिस यांनी येऊन पंचनामा केला व शवविच्छेदन करण्यासाठी सावली ग्रामीण रुग्णालय नेण्यात आले.या अपघातामुळे शंकाकुशंका निर्माण होत आहे.कारण घटनास्थळापासून गाडी एकीकडे व तो लांब पडून घटनास्थळ दिसल्याने शंका निर्माण होत आहे.कोणी ठोकले की याणी ठोकल हे कळले नाही शंकेच्या भोवऱ्यात सापडले. पुढील तपास सावली पोलिस करीत आहेत.