मोहफुल वेचायला गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून केले जागीच ठार.

मोहफुल वेचायला गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून केले जागीच ठार.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक, 04/04/2025 मोहफुल वेचायला गेलेल्या मनोहर सखाराम चौधरी यांच्यावर मोह वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला.त्यात ते जागीच ठार झाले.त्यांचे वय अंदाजे 63 वर्ष होते.


सदर घटना काल सकाळी 9:00 ते 10:00 वा.च्या सुमारास घडली असावी.नेहमीप्रमाणे मनोहर चौधरी ज्या आवळगाव बीटातील कक्ष क्रमांक 1138 मधील झाडा खाली मोह वेचायचे त्या ठिकाणी ते सकाळी गेले होते.


दुपार झाली तरी ते घरी  परत न आल्यामुळे त्यांची शोधा शोध सुरू झाली असता गावकऱ्यांना ते ठार झालेल्या अवस्थेत दिसले.घटनेची माहिती वनविभाग ब्रह्मपुरी व मेंडकी पोलिसांना देण्यात आली असता वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी.शेंडे व पोलीस विभाग आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.


त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,मुलगी असून बराच मोठा आप्तपरिवार आहे.आवळगांव,हळदा या परिसरात वाघाने ठार केल्ल्याच्या घटना ही नित्याचीच बाब ठरलेली आहे.


या परिसरातील जनता जीवावर उद्धार होऊन आपली कामे जंगली स्वापदांच्या दहशतीखाली करीत असतात.तातडीची मदत म्हणून वनविभागाने मृतकाच्या कुटुंबियाला 50 हजाराची मदत  दिली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !