गडचिरोली ते चामोर्शी महामार्गावरील वाकडी फाट्याजवळ कारने दूध विक्रेत्याला जोरदार धडक दिल्याने जागीच ठार.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली ते चामोर्शी महामार्गावरील वाकडी फाट्याजवळ भरधाव वेगाने चामोर्शीकडे जाणाऱ्या कारने गडचिरोली येथे दूध विकायला येत असलेल्या सायकलस्वाराला जोरदार धडक दिली.यात सायकलस्वार जागीच ठार झाला.ही घटना आज दि.11/04/2025 सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार सकाळी गडचिरोली कडून चामोर्शीकडे जात असलेल्या मारुती कंपनीच्या वॅगनार (क्रमांक CG 08 AU 8932) कारने गडचिरोली येथे दूध विकायला येत असलेल्या वाकडी येथील विनायक भोयर यांच्या सायकलला जोरदार धडक दिली.यात विनायक भोयर यांना जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला.
सदर कार ही छत्तीसगड राज्यातील असून चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.