शेतात काम करण्यासाठी गेलेल्या दोघांचा वीज कोसळल्याने मृत्यू.
एस.के.24 तास
तुमसर : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या दोघांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास पाथरी येथे घडली.मनिषा भारत पुष्पतोडे वय, 25 वर्ष व प्रमोद नागपुरे वय,45 वर्ष असे मृतकांची नावे असून दोघेही पाथरी येथील रहिवासी आहेत.हमामान विभागाने आज दिवसभर पावसाचा अंदाज वर्तविला आहे.