गडचिरोली शहरानजीकच्या नवेगाव (मुरखळा) येथे भरदिवसा जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त अधिकारी महिलेची खलबत्त्याचा रॉड मारुन हत्या.

गडचिरोली शहरानजीकच्या नवेगाव (मुरखळा) येथे भरदिवसा जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त अधिकारी महिलेची खलबत्त्याचा रॉड मारुन हत्या.


एस.के.24 तास 


गडचिरोली : गडचिरोली शहरानजीकच्या नवेगाव (मुरखळा) येथे भरदिवसा जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त अधिकारी महिलेची खलबत्त्याचा रॉड मारुन हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. कल्पना केशव उंदिरवाडे वय,61 वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे.


कल्पना उंदिरवाडे यांच्या घरी काम करणारी महिला आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी गेली असता त्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या शरीरावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याच्या जखमा होत्या. घराचे सर्व दरवाजे उघडे होते.शिवाय टीव्ही ही सुरु होता. घरकाम करणाऱ्या महिलेने ही माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 


चामोर्शी मार्गावरील एका पेट्रोल पंपवर काम करणारा कल्पना उंदिरवाडे यांचा जावईदेखील घरी पोहचला.पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी रात्रौ. 8:00 वा.मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. 


पोलिस अधीक्षक नीलोत्पल,उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे हे पथकासह घटनेचा तपास करीत आहेत. 


विशेष म्हणजे मृत कल्पना उंदिरवाडे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या बोटातील 3 अंगठ्या तशाच होत्या. शिवाय अंगावरील अन्य दागिनेही सुरक्षित होते. त्यामुळे त्यांची हत्या चोरीच्या हेतूने झाली नसावी, हे स्पष्ट होते. त्यामुळे हत्या करणारा नेमका कोण ? तो जवळचा व्यक्ती असावा ? असाही संशय व्यक्त केला जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !