आई च्या डोळ्यासमोर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला जबर धडक दिल्याने सात वर्षाच्या चिमुकल्याचा मागील चाकात येऊन जागीच मृत्यू.

आई च्या डोळ्यासमोर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला जबर धडक दिल्याने सात वर्षाच्या चिमुकल्याचा मागील चाकात येऊन जागीच मृत्यू.


एस.के.24 तास 


अमरावती : अमरावती ते बडनेरा मार्गावर जुन्या वस्तीतील सजनाजीबुवा हनुमान मंदिरापासून थोड्या अंतरावर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला जबर धडक दिल्याने सात वर्षाच्या चिमुकल्याचा मागील चाकात येऊन जागीच मृत्यू झाला, तर आई जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी दुपारी घडला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुद्र मंगेश घीडाणी (7 रा.न्यू प्रभात कॉलनी, नवीवस्ती, बडनेरा) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. 


तो अमरावती ते बडनेरा मार्गावरील एका शाळेत पहिल्या वर्गामध्ये शिकत होता. नेहमीप्रमाणे त्याच्या आईने त्याला शाळेत सोडून देण्यासाठी दुचाकीवर घेतले. मार्गातील सजनाजी बुवा हनुमान मंदिराजवळ अचानकपणे MH.14 LX 8863 क्रमांकाच्या बसने दुचाकीला जबर धडक दिली.

दुचाकीवर मागे बसलेला रुद्र हा बसच्या मागील चाकाखाली आला, तर त्याची आई विरुद्ध दिशेने फेकली गेली. अपघात घडल्याचे निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जबर जखमी झालेल्या रुद्रला नागरिकांनी अमरावतीला उपचारासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.तेवढ्यात त्याचा मृत्यू झाला. 

चिमुकल्याच्या मृत्यूमुळे बडनेरा नवी वस्ती परिसरात शोकमय वातावरण आहे. आईच्या डोळ्यादेखत चिमुकल्याचा मृत्यू झाला. अपघातस्थळी मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांनी तत्काळ पोहचून परिस्थिती सांभाळली. अपघातास कारणीभूत ठरलेली बस ही अकोला-चंद्रपूर फेरी करीत होती. 

चालक दिगंबर मंगल कनाके वय,41वर्ष रा.शेखबराज ता.भद्रावती जि.चंद्रपूर याला बडनेरा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रुद्रच्या अपघाती मृत्यूनंतर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमरावती शहरात अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. दोन दिवसांपुर्वी राख वाहून नेणाऱ्या वाहनातून राख उडाल्याने हार्वेस्टरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीला धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नांदगावपेठ नजीक घडली होती. 

या अपघातानंतर मृत युवकाच्या कुटुंबीयांनी शवागृहासमोर आक्रोश करीत राखेच्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी रेटून धरली होती. जिल्ह्यात दरवर्षी 35 ते 40 हजार नवीन वाहन रस्त्यांवर येत आहे. त्यातच बहूतांश वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. 

अपघात होऊ नये यासाठी शासकीय यंत्रणाकडून प्रयत्न सुरूच आहे, यावेळी प्रत्येक वाहनचालकाने नियमांचे पालन करून अपघात टाळणे गरजेचे आहे. कारण अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या एकूण व्यक्तींमध्ये 15 ते 40 या वयोगटाची टक्केवारी ही ५० टक्केच्या आसपास आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !