जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर निवडणुकीचे खासदार,आजी - माजी सर्वांनाच वेध. 📍नोकर भरतीतील अर्थकारणानंतर सर्वांनाच हवे संचालकपद.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर निवडणुकीचे खासदार,आजी - माजी सर्वांनाच वेध.


📍नोकर भरतीतील अर्थकारणानंतर सर्वांनाच हवे संचालकपद.


एस.के.24 तास 


चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे.अंतिम मतदार यादी 16 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.जिल्हा बँकेच्या संचालकपदावर काँग्रेस,भाजप या प्रमुख पक्षांसह इतरही पक्षांचे नेते दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना पाठवतात.

बँकेतील ३६० पदांच्या नोकर भरतीतील अर्थकारणानंतर लोकप्रतिनिधींनाही बँक हवीहवीशी वाटायला लागली आहे. त्यामुळेच खासदार, आमदारांपासून माजी मंत्री, माजी जिल्हा परिषद सदस्य,माजी नगरसेवक यांनाही बँकेच्या संचालकपदाची स्वप्ने पडायला लागली आहेत.जिल्हा बँकेत नुकतीच लिपीक व शिपाई संवर्गाच्या ३६० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. 

या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अर्थकारण झाल्याची चर्चा बँकेच्या वर्तुळात आहे. यापूर्वी खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांना आणि सहकार क्षेत्राची उत्तम जाण व अभ्यास असलेल्यांना बँकेच्या संचालकपदाची संधी दिली जायची.

आता लोकप्रतिनिधीच संचालकपदाच्या निवडणुकीची तयारी करीत आहे. खासदार, आमदार व बँकेत संचालकदेखील आम्हीच, कार्यकर्त्यांनी केवळ सतरंजी उचलायची, पदे आम्हीच उपभोगणार, अशी मानसिकता आज राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र आहे.

बँकेची तात्पुरती मतदार यादी बघितली असता, त्यात खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवर, आमदार किशोर जोरगेवार यांनी दावेदारी दाखल केल्याचे दिसते. माजी मंत्री शोभा फडणवीस यांनीदेखील तयारी चालविली आहे. तसेच माजी संचालक सुभाष रघताटे, संजय डोंगरे

माजी आमदार सुदर्शन निमकर, ॲड. वासुदेव खेळकर, वसंत विधाते,जी.के.उपरे, रामनाथ कालसर्पे यांच्याकडूनही निवडणुकीची तयारी सुरू आहे. दिनेश चोखारे, सतीश वारजूरकर, प्रकाश देवतळे, सुरेश दर्वे, गणेश तर्वेकर, आवेश खान पठाण, तुकाराम पवार, सुरेश महाकुलकर, प्रकाश चिटणुरवार, आशुतोष चटप, सुभाष ताजने, शेषराव बोंडे

पंकज पवार, अमर बोधलावार, जयंत टेमुर्डे, सुधीर मुढेवार, विनोद बागुल, रामभाऊ टोंगे,रवींद्र मारपल्लीवर, चंद्रकांत गुरु, विलास विखार, नितीन उराडे, अशोक सोनटक्के, श्याम थेरे, सुरेंद्र डोहे,संतोष तंगडपल्लीवर,निशिकांत बोरकर,सिद्धार्थ पठाडे, मधुकर भगत,ॲड.शिवलकर, नारायण जांभुळे, राजू चिकटे,प्रमेश मुथा, 

सौ.सुनंदा ज्ञानेश्वर डुकरे,सौ.रागिणी दिगांबर गुरपुडे, रुपाली रवींद्र शिंदे,आश्लेषा शरद जिवतोडे यांच्यासोबतच सोबतच बँकेचे माजी अधिकारी राजेंद्र बरडे, मूर्ती शिंगरे, जनार्धन डुकसे यांनी देखील उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे बँकेची निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !