तू दिसता या गाण्याची तरुण मनांवर भुरळ संगीतकार जगदीश गोमीला यांचे मनोगत.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : नुकतच पॅनोरमा मराठी म्युजिक यूट्यूब चैनल वरती प्रदर्शित झालेलं " तू दिसता मन बावरे झाले " हे गाणं सध्या चांगलेच वायरल होत आहे.ब्रह्मपुरी च्या कलाकारांनी या गाण्यामुळे चहु दिशेला छाप पाडली.
गाण्यांची निर्माती व गीतकार डॉ. रीना धनपाल बागडे, सहनिर्माते इंजि. भूषण रामटेके,सहनिर्माते व गाण्याचे संगीतकार जगदीश गोमिला हे सर्व ब्रह्मपुरी येथील आहे. इंडियन आयडल फेम आशिष कुलकर्णी यांनी गोड आवाज दिला.एखाद्याला प्रेमाची चाहूल अशी लागते व तो आपल्या स्वप्नांच्या दुनियेत रममाण होतो.
याचे चित्रन नॅशनल स्कूल ड्रामा मधून शिकून आलेला दिग्दर्शक सौरभ गुरु यांनी केला तर प्राची मंगल, शुभम उगले या कलाकारांनी आपल्या हावभावातून प्रेम आणि त्याची धडपडीचे सुंदर असे वर्णन या गीतात मांडले गेले आहे.
याचे संपूर्ण चित्रीकरण जवळच असलेल्या ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव,मिनीघरी, घोडाझरी,खडकी, परिसरात झाला या गाण्यासाठी कॅमेरा अजय व विजय ढोके, अमीत पुरकाम, वेशभूषा विकास चहारे,अभिनव कात्यायन,शरद अंबादे,विशेष सहकार्य केले.
हे गाणं सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध असुन या संपूर्ण टीमला शुभेच्छा व भरभरून कौतुकाने गाण्यावर नृत्य रील तयार करून रसिक पाठवित आहेत .