एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र विद्यालय,आवळगांव ची जुई झरकर प्राविण्यासह उत्तीर्ण.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०२/०४/२५ राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी (NMMS) नुकत्याच घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र विद्यालय, आवळगांव ची विद्यार्थिनी कुमारी जुई सुरेश झरकर हीने विद्यालयातून बसलेल्या एकूण ०५ विद्यार्थ्या मधून ८६,% गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाली आणि सामान्य गटातून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरली.
तिने संपादन केलेल्या या यशामुळे मार्गदर्शक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एल.दिघोरे,सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.तिने मारलेल्या या उत्तुंग भरारीमुळे आवळगांव व परिसरातील जनतेने कौतुक करून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तिने आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व आई - वडील यांना दिले.