पाणपोई व मानव कुटीचे उद्घघाटन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१६/०४/२५ प्रा.डॉ.संजय हर्षे माजी प्राचार्य यांचे वडील स्व. प्रभाकर राव गोपाळराव हर्षे यांच्या ३७व्या पुण्यतिथीनिमित्त व त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रा. हर्षे यांच्या घरासमोर वडसा रोड ज्ञानेश्वरी नगरी येथे पाणपोई सुरू करून त्यांचे उद्घघाटन व लोकांपर्ण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त माजी प्राचार्य डॉ.भाऊसाहेब जगनाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच ब्रह्मपुरी नगरातील एकमेव मानवकुटिचे उद्घघाटन सुध्दा त्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या प्रसंगी प्रा. हर्षे सर यांनी मनोगत व्यक्त करतांना मनाले की, सर्व धर्म श्रेष्ठ असून सुद्धा मानवाने मानव धर्माचे पालन करावे, आपल्या आईवडीलांचे ऋण कधिच फेडता येत नाही ते ऋण फेडण्यासाठी फुल नाही तर फुलांची पाकळी आपण फेडु शकतो. मानव सेवा हिच ईश्वरी. सेवा होय असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रा.हर्षे यांनी नुकताच वास्तु विशारद कोर्स पूर्ण केला आहे. या कार्यक्रमा प्रसंगी प्रा.दिलीप जगनाडे, प्रा. विटाळकर सर,फकिरा जी कुर्वे, विलास खरवडे,नानाजी गराडे,कु.वैभवी येरमा,कु.उर्वशी चिंचुरकर सौ.अंकिता सुरज चिंचुरकर,उपस्थित होते.