राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा आदर्श गाव मौजा कळमना येथे अनेक महापुरुषाचे विचार जोपासण्यात येतात, अनेक महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत, पुतळे उभारून त्यांच्या विचारांचा वसा घेऊन कळमना येथील आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी गावकरी मंडळी यांच्या सहभागातून आदर्श ग्राम निर्माण केले आहे. याच परंपरेला जोपासत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई, ह भ प ईश्वर महाराज मासटवार, ह भ प सुधाकर महाराज कावळकर, उपसरपंच कौशलया कावळे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, प्रभाकर साळवे अध्यक्ष हनुमान मंदिर देवस्थान, महात्मा फुले समाज सुधारक मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत कुकुडे, प्रवीण भेडारे, रामचंद्र कुकुडे
अमोल कावळे, प्रवीण वाढई, जेष्ठ नागरिक कवडु पिंगे, सुभाष वाढई, गणपती कुकुडे, लटारी बल्की, शंकर फिसके, जेष्ठ महिला मीराबाई वाढई, कुंदा बल्की, शकुंतला पिंगे, संगीता कुकुडे, शामकला कावळे, गिरीजाबाई वाढई, माया कुकुडे, मनिषा कावळे यासह बचत गटाच्या महिला व गावकरी उपस्थित होते.