श्री.संत रविदास समाजा तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी :- १३/०४/२५ संत रविदास चौक येथे आयोजित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा.पोटे पॉलीटेकनिक कॉलेज, ब्रम्हपुरी उपस्थित होते.आज बहुजन समाजात होत असलेला परिवर्तन हा महात्मा फुलेंनी दिलेली शिकवण आहे असे मत मत याप्रसंगी व्यक्त केले.
प्रमुख अतिथी म्हणून प्रा.संजय वाळके,डॉ. मेंढे उपजिल्हा रुग्णालय ब्रम्हपुरी, ऋषीं भाऊ भाषेशंकर व संत रविदास समाज मंडळ अध्यक्ष अंकज मो. कानझोडे यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले संपूर्ण बहुजनांचे पुढारी असून स्त्री शिक्षणासोबतच समाजातील जातीभेद-भाव मिटविण्याचं महत्वपूर्ण कार्य केले तसेच त्यांनी केलेल्या विविध कार्याचे महत्व संत रविदास समाजाला पटवून दिले.
संत रविदास समाजाचे उपाध्यक्ष - शिरीष भसाखेत्रे, सचिव - दुर्गेश भसाखेत्रे, अजय पाटील, यश वादीकर,अमित बावणे, कार्तिक लोखंडे, समाज महिला अध्यक्ष हेमाताई अंडेलकर व मोठ्या प्रमाणात संत रविदास समाजबांधव व महिला वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऍड जयप्रकाश अंडेलकर यांनी केले.