बल्लारपूर येथील तहसीलदार अभय गायकवाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात तर कवडजई साझ्याचा तलाठी सचिन पुकळे फरार.
एस.के.24 तास
बल्लारपूर : बल्लारपूर येथील तहसीलदार आणि तलाठ्याला लाच मागणे चांगलेच महागात पडले आहे.2 लाख 20 हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या विरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड ला ताब्यात घेतले आहे.
तर कवडजई साझ्याचा तलाठी सचिन पुकळे याचा शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी घेत आहे.
लाचलुचपत विभागाने पडताळणी करून या तहसीलदार आणि तलाठयाच्या मुसक्या आवळत बल्लारपूर येथे गुन्हा नोंदवत बल्लारपूर तहसीलदार ला ताब्यात घेतले आहे.
तलाठी फरार झाला आहे.चंद्रपूर लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाई ने महसूल प्रशासनातला भ्रष्टाचार समोर आला आहे. यामुळे महसूल प्रशासनात मोठी खळबळ माजली असून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा आणि गौण खनिज उत्खनन करणारे कंत्राटदार यांच्यातील संबंध चर्चेत आले आहेत.
व त्यांच्यावर ही कारवाई व्हायला पाहिजे हा विषय अग्रक्रमाने पुढे येत असून शासनाने आपल्या ध्येयधोरणावर पुनर्विचार करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.
सदरची कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असून पुढील तपास सुरू आहे.