अ-हेरनवरगांव,भालेश्वर शेतशिवार परिसरात पट्टेदार वाघाच्या दर्शनामुळे भीतीचे वातावरण.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०१/०४/२५ ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव , भालेश्वर वैनगंगा किनारी लागून असलेल्या उन्हाळी धान लागवडीच्या शेतशिवारात आज सकाळी ७-००वाजेपासुन पट्टेदार वाघाचे दर्शन शेतकऱ्यांना झाले.
वाघाचे दर्शन झालेल्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे मोटार पंप सुरू करणारे , औषधी फवारणी करणारे ,खत मारणा-या शेतक-यांनी आपली हातची कामे जशीच्या तशी टाकून शेतामधून पळ काढला. वाघ आला रे आला अशी बोंब गावात पसरताच गावकऱ्यांनी वाघ ज्या धानाच्या शेतात बसून आहे त्या दिशेने धाव घेतली आणि त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली.
अ-हेरनवरगांव शेतशिवारात वाघ आला याची माहिती ब्रह्मपुरी येथील वनविभागाला देण्यात आली असता वनविभाग अधिकारी सेमस्कर व सैय्यद आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.अ-हेरनवरगांव व परिसर हा जंगल व्याप्त नसून सुद्धा मागील वर्षीपासून जनतेला फुकट पट्टेदार व बिबट वाघाचे दर्शन घडत आहे.