गडचिरोली पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय " पोलीस पाटील समन्वय बैठकीचे " आयोजन जिल्ह्यातील विविध गावांतील सुमारे 600 पोलीस पाटलांची उपस्थिती. पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासनाचे डोळे व कान बनून काम करावे. - श्री.नीलोत्पल,पोलीस अधीक्षक गडचिरोली

गडचिरोली पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय " पोलीस पाटील समन्वय बैठकीचे " आयोजन जिल्ह्यातील विविध गावांतील सुमारे 600 पोलीस पाटलांची उपस्थिती.


पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासनाचे डोळे व कान बनून काम करावे. - श्री.नीलोत्पल,पोलीस अधीक्षक गडचिरोली


एस.के.24 तास 


गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे दुर्गम- अतिदुर्गम भागातील नागरिकांशी समन्वय साधण्यासाठी पोलीस पाटील ह्रा पदावर असलेला व्यक्ती मुख्य भूमिका निभावत असतो. गावामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, अंधश्रद्धा, गंभीर गुन्हे, काळी जादू, गावातील भांडणे इत्यादी कारणावरुन घडत असलेल्या विविध गुन्ह्रंावर प्रतिबंध करण्यात पोलीस पाटील यांची महत्वपूर्ण जबाबदारी तसेच 


पोलीस पाटील हा सामान्य जनता व पोलीस प्रशासन यामधील महत्वपूर्ण दुवा असून गावागावात पोलीसांच्या कार्याचे प्रतिनिधीत्व पोलीस पाटील करीत असल्याची बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 08/04/2025 रोजी जिल्ह्रातील विविध गावातील पोलीस पाटील यांच्या जिल्हास्तरीय समन्वय बैठकीचे आयोजन पोलीस मुख्यालय येथील शहीद पांडू आलाम सभागृह येथे करण्यात आले होते.


सदर कार्यशाळेकरिता जिल्ह्रातील विविध गावांतील सुमारे 600 पोलीस पाटील उपस्थित होते. या कार्यशाळेदरम्यान गुन्हे, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस पाटील यांचे कर्तव्य व त्यांचेवर असणा­या जबाबदा­या, गंभीर गुन्हे व व्यसनमुक्ती, तंटामुक्ती, सामाजिक सलोख्याची जपणूक, अंधश्रद्धा जनजागृती इ. विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. 


त्यानंतर पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपस्थित पोलीस पाटील यांना आवाहन केले की, “गावामध्ये पोलीसांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतांना तुम्ही डोळे व कान बनून काम करावे. तसेच गावातील अंधश्रद्धा, वन्यप्राणी शिकार, कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत गावातील प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच येणा­या काळामध्ये विविध सण-उत्सवांदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही म्हणून सतर्क राहिले पाहिजे. 


यासोबतच समन्स वॉरंट बजावण्यामध्ये, फरारी आरोपी शोधण्यास मदत केली पाहिजे. अतिदुर्गम भागात रात्री अपरात्री घडणा­या गुन्ह्रंाची माहिती पोलीस प्रशासनाला तात्काळ देणे तसेच महिला पोलीस पाटील व गावांतील इतर महिलांनी आपल्या परिसरातील अवैध दारु विक्री करण्या­यांवर बंदी घालणे तसेच गावातील नागरिकांचा अंधश्रद्धेवर असलेला विश्वास व त्यांच्या लहान मुलांचे जीव धोक्यात घालणा­या अंधश्रद्धांवर वेळीच निर्बध घालण्यासाठी त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करावा. 


यासोबतच जिल्ह्रातील सामाजिक सलोखा बिघडवू पाहणा­या व्यक्तींवर लक्ष ठेऊन त्यांच्याबाबत पोलीस प्रशासनाला तात्काळ माहिती देऊन आपले कर्तव्य तठस्थपणे पार पाडावे. उत्तर गडचिरोली जिल्हा आता माओवादापासून मुक्त झाला आहे, माओवादग्रस्त जिल्हा ही ओळख संपवून गडचिरोली जिल्हा आता विकासाकडे वाटचाल करत आहे यासाठी आपण सर्वांनी समोर येऊन प्रशासनाला सहकार्य करावे. ” 

 

समन्वय बैठकप्रसंगी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. विनोद चव्हाण उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र गाव कामगार संघटना गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष श्री. योगराज नाकाडे, महाराष्ट्र पोलीस पाटील असोसीएशन गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष श्री.अनिल खेवले व महिला जिल्हाध्यक्ष गाव कामगार संघटना श्रीमती लता ऊईके यांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले.


सदर कार्यक्रमप्रसंगी स्थागुशाचे पोनि.अरुण फेगडे यांनी प्रस्तावना सादर केली.तसेच आभार प्रदर्शन प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री.विनोद चव्हाण यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी स्थागुशाचे प्रभारी अधिकारी पोनि.श्री.अरुण फेगडे,जिविशाचे पोनि.श्री. निखिल फटींग,स्थागुशाचे सपोनि.राहुल आव्हाड,सपोनि. भगतसिंग दुलत व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परीश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !