ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव (जाणी) येथे बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेतकरी जखमी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१२/०४/२५ ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव (जाणी )येथे आज सकाळी नांदगाव- नान्होरी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत चार (कुबळ्या वाघ) तळस वाघ बिबट्याला घेरुन चावा घेत असताना शेतावर जाणाऱ्या पाच-सहा शेतकऱ्यांनी पाहिले. तळसांच्या तावडीतून सुटका करून बिबट्याने लोकांच्या दिशेने पळ काढला.
व 4 - 5 लोकांमधून एकावर हल्ला केला. आणि त्याला जखमी करून पांदण रस्त्याने नदीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पाईपात दळून बसला . सोबतच्या लोकांनी आरडाओरोड केली असता गावातील अंदाजे 200 ते 300 गावकऱ्यांनी पाईपात लपून बसलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली.
गर्दीतील उनाड नागरिक, तरुण लपलेल्या बिबट्याला दगड मारून त्रास देऊ लागले तेव्हा बिथरलेल्या बिबट्याने गर्दीतील नागरिकांवरती हल्ला केला या दोघांना जखमी करून पळून गेला. सदर घटना आज सकाळी 6:30 ते 7:00 वाजे दरम्यान घडली.
जखमींमध्ये
1)ओनम प्रकाश सोंदरकर वय,18 वर्ष
2)प्रफुल्ल राजेश्वर सहारे वय,27 वर्ष
3) देवेंद्र नानाजी पिलारे वय,37 वर्ष सर्व नांदगाव जाणी येथील रहिवासी आहे.
चौथ्या व्यक्तीचे नशीब बलवत्तर म्हणून तो हल्ल्यातून वाचला.
वनविभागाला घटनेची माहिती दिली असता घटनास्थळी वनविभाग अधिकारी दाखल होऊन फटाके फोडून बिबट्याचा शोध घेत आहेत.काही दिवसा अगोदर नांदगाव (जाणी) येथील डांगे या शेतकऱ्यावर पट्टीदार वाघाने हल्ला करून जख्मी केल्याची घटना ताजी आहे.या परिसरात पट्टेदार वाघ,तडस,बिबट यांनी धुमाकूळ घातला आहे.
हिंस्त्र पशुंच्या दहशतीखाली शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घालून शेतावरती गवत घेण्यासाठी, मोटार पंप सुरू करण्यासाठीधानातील निंदन काढण्यासाठी जाणे येणे करावे लागते. वनविभागाने नांदगाव,भालेश्वर,अ-हेरनवरगांव, पिंपळगाव (भोसले)या परिसरात फिरत असलेल्या पशु वरती बारीक लक्ष ठेवून गस्त वाढविली आणि पळून गेलेल्या बिबट्याचा शोध घेत आहेत.