देऊळगाव धान खरेदी केंद्र येथील धान खरेदी अपहारातील दोन आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक.
📍सन 2023 - 24 व 2024 - 25 या दोन्ही वित्तीय वर्षात एकुण 3,96,65,965/- रुपयांचा झाला होता अपहार.
एस.के.24 तास
कुरखेडा :शेतकयांनी पिकविलेल्या शेतमालाला आधारभुत किंमत देण्याकरीता शासन विविध योजना राबवित असते. राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतकयांनी पिकविलेले धान विविध खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाते.
खरेदी केलेल्या धानाची प्रादेशिक कार्यालय समिती स्तरावर मा. जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने नेमलेल्या मिलर्सकडून बँक गॅरंटीच्या प्रमाणात धानाचे वितरण केले जाते. जावक धानाचे वितरण आदेश मिलर्स व खरेदी केंद्रावरील केंद्रप्रमुख यांच्या स्वाक्षरीने वजन पावत्यांसह उप-प्रादेशिक कार्यालयास सादर केले जातात.
मिलर्सने उचल केलेल्या धानाची भरडई करुन तयार होणारा तांदुळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे अधिनस्त गोदामात जमा करण्यात येतो. जमा केलेल्या तांदळाच्या स्विकृत पावत्या मिलर्सद्वारा प्रादेशिक कार्यालयात सादर करण्यात येतात. परंतू, सदर प्रक्रियेदरम्यान देऊळगाव येथील धान खरेदी केंद्रात धानाचे अपहार झाल्याचे दिसून आले होते.
गडचिरोली जिल्ह्रातील उप-प्रादेशिक कार्यालय, कुरखेडा अंतर्गत देऊळगाव येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम 2023-2024 व 2024-2025 या दरम्यान अपहार झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रादेशिक व्यवस्थापक, गडचिरोली यांचे तर्फे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
सदर चौकशीत आढळून आले की, आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्या. देऊळगाव येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम 2023-2024 मध्ये एकुण 19860.40 क्विंटल धानाची खरेदी झाली होती. त्यापैकी प्रत्यक्ष 15916.32 Ïक्वटल धान भरडईकरिता जावक झालेला असून उर्वरित 3944.08 Ïक्वटल धानाची तफावत दिसून आली तसेच एकदा वापरलेले जुने बारदान यांच्या संख्येत देखील तफावत दिसून आल्याने एकुण 1,53,93,980/- रुपये इतक्या रक्कमेचा अपहार झाल्याचे आढळून आले.
यासोबतच सन 2024-2025 मध्ये खरेदी धानाची तपासणी केली असता, एकुण 17262.40 Ïक्वटल धानाची खरेदी झाली होती. त्यापैकी प्रत्यक्ष 11122.40 Ïक्वटल धान खरेदी केंद्रावर आढळून आला असून उर्वरित 6140.00 क्विंटल धानाची तफावत तसेच एकदा वापरलेले जुने बारदान यांच्या संख्येत तफावत दिसून आल्याने एकुण रुपये 2,42,72,885/- रुपये इतक्या रक्कमेचा अपहार झाल्याचे आढळून आले. अशाप्रकारे सन 2023-24 व 2024-25 या दोन्ही वित्तीय वर्षात एकुण 3,96,65,965/- इतक्या रक्कमेचा अपहार झाल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले.
याकरीता, उप-प्रादेशिक व्यवस्थापक, कुरखेडा मुरलीधर शंकर बावणे, प्रभारी विपणन निरीक्षक तथा ग्रेडर चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर, विपणन निरिक्षक तथा ग्रेडर हितेश व्ही. पेंदाम, सचिव महेंद्र इस्तारीजी मेश्राम व इतर 13 अध्यक्ष/उपाध्यक्ष व संचालक मंडळ
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. देऊळगाव यांनी पदाचे कर्तव्य व जबाबदारी यात कसूर केल्या कारणाने, उप-प्रादेशिक व्यवस्थापक, म.रा.सह.आदिवासी विकास महामंडळ मर्या.आरमोरी श्री.हिंमतराव सुभाष सोनवणे यांच्या लेखी फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन कुरखेडा येथे आज दिनांक 19/04/2025 रोजी अप क्र. 69/2025 कलम – 316 (5), 318 (4), 3 (5) भान्यासं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच गडचिरोली पोलीसांनी तपासाची गती तीव्र करुन
आरोपी नामे 1) चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर वय,39 वर्ष, व्यवसाय - नोकरी (प्रभारी विपणन निरीक्षक तथा ग्रेडर, आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्या. देऊळगाव) रा. लहाण गोधनी,पो. जुना उमरसरा,तह.जि. यवतमाळ
2) हितेश व्ही.पेंदाम वय,35 वर्ष,नोकरी (विपणन निरीक्षक तथा ग्रेडर) रा.आरमोरी तह.आरमोरी जि. गडचिरोली यांना अटक केले असून त्यांना मा. न्यायदंडाधिकारी, कुरखेडा यांचेसमक्ष हजर करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्रातील इतर आरोपींचा शोध घेणे सुरु असून गुन्ह्राचा पुढील तपास पोनि. महेंद्र वाघ पोस्टे कुरखेडा हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी कुरखेडा पोनि. श्री. महेंद्र वाघ आणि पोस्टे कुरखेडाचे अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.