डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात 18 तास अभ्यासाचा संकल्प.
अमरदीप लोखंडे ! सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१५/०४/२५ मान.सहसंचालक उच्च शिक्षण,नागपूर यांच्या निर्देशानुसार स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रह्मपुरी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या निमित्ताने १८ तास अभ्यास अभियानाचे आयोजन करण्यात आले .
डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदाचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी या अभियानाचे उद्घाटना प्रसंगी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले .प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात ज्याप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १८/१८तास अभ्यास केला त्या पासून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन वाचनाचा नुसता संकल्पच नव्हे तर प्रत्यक्षात त्या संकल्पाला मूर्त द्यावे असे भाष्य करून अभियानात स्वतःसहभागी होऊन विद्यार्थी आणि प्राध्यापकाना शुभेच्या दिल्या.
याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन उत्स्फूर्तपणे अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला दिला.कार्यक्रमाचे संचालन आणि आभार ग्रंथालय विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.उमेश हरडे यांनी केले.