पोस्टे कोरची पोलीसांनी केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 16,01,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.
एस.के.24 तास
कोरची : गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये आज दिनांक 12/04/2025 रोजी पांढया रंगाच्या बोलेरो पिकअप या चारचाकी वाहनाने देवरी ते कोरची रोडने अवैधरित्या दारुची वाहतुक करणार आहे.
अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे कोरची पोनि. शैंलेद्र ठाकरे व त्यांचे एक पथक सदर ठिकाणी रवाना करण्यात आले. सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे
मौजा पकनाभट्टी जांभळी जाणाया कच्च्या रस्त्याच्या कडेला सापळा रचुन बसले असता,सकाळी 06:40 वा. चे दरम्यान एक पांढया रंगाची बोलेरो चारचाकी वाहन संशयास्पदरित्या येतांना दिसली असता, पोलीसांनी वाहन चालकास हात दाखवून थंाबण्याचा ईशारा केला. त्यावेळी वाहन चालकाने त्याचे वाहन रस्त्याच्या कडेला थांबविले. त्यानंतर त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव धम्मत गुणवंत बोरकर रा.गिधाडी ता. गोरेगाव जि. गोंदिया असे सांगितले.
त्यानंतर त्यास वाहन अडविण्याचे कारण सांगून सदर वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या मागील ट्रॉलीत असलेल्या मुरमुयांच्या बोयाखाली 80 - खरड्या च्या बॉक्समध्ये गोवा विस्की, 10 – खरड्या च्या बॉक्समध्ये विदेशी कंपनीचे मॅगडोवेल्स नं. 01, 07- खरड्या च्या
बॉक्समध्ये किंगफिशर कंपनीचे बियर बॉटल, 03 खरड्या च्या बॉक्समध्ये विदेशी कंपनिचे ऑफिसर चॉईस असे एकुण 9,97,200/- रुपयांचा दारुचा मुद्देमाल, 4000 रुपये किंमतीचे मुरमुयांच्या बोया व वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी पांढया रंगाची महिंद्रा बोलेरो मॅक्स ट्रक प्लस वाहन, वाहन क्र. सी जी 08 ए. के. 8453 अंदाजे किंमत 6,00,000/- रुपये असा एकुण 16,01,200/- (अक्षरी सोळा लाख एक हजार दोनशे रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला.
संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे कोरची येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम 65, 98, 83 म.दा.का. सह कलम 3/181, 130/177 मो.वा.का अन्वये आरोपी नामे धम्मत गुणवंत बोरकर, वय 24 वर्षे, रा. गिधाडी ता. गोरेगाव जि. गोंदिया व अज्ञात फरार आरोपी यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर चालक आरोपी नामे धम्मत गुणवंत बोरकर याला मा. न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने त्यास 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्रातील फरार आरोपींचा शोध घेणे सुरु असून, गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि. प्रविण बुंदे, पोस्टे कोरची हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री.रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी कोरची पोनि. शैंलेद्र ठाकरे, पोउपनि. योगेश पवार, पोउपनि. प्रविण बंुदे, पोहवा/राकेश मेश्राम, पोअं/दिनेश कुवर, इंसाराम ताराम यांनी पार पाडली.