जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ,नागपूर " 11 वा वर्धापन दिन " निमित्ताने विकास ऊर्फ विक्कीकुमार भैसारे पुरस्काराने सन्मानित.
सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक
आरमोरी : जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळच्या 11 व्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे दिनांक 30 मार्च 2025 ला संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमात देशातील विविध राज्यातील साहित्यिक विचारवंत सहभागी झालेले होते.
यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील रहिवाशी साहित्यिक विचारवंत श्री.विकास (विक्किकुमार) भैसारे यांचा त्यांनी साहित्य,संगीत व सामाजिक कार्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ.प्रकाश कर्माडकर कुलगुरू आंतरराष्ट्रीय विद्यापीठ त्रिपुरा,महान विचारवंत साहित्यिक लेखक डॉ.राजेश गायकवाड
प्रा.दिपककुमार खोब्रागडे अध्यक्ष जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
सायंकाळी गडचिरोली येथील विक्कीकुमार भैसारे प्रस्तुत उजळली धम्मज्योत भिमस्वरांची या समाजप्रबोधन कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलेला होता.