PMJJBY अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पॉलिसी धारकाच्या पत्नीस धनादेश सुपूर्द करण्यात आला.
एस.के.24 तास
सावली : पाथरी येथील गणेश अरविंद कोतपल्लीवार यांच्या मृत्यू झाला असल्याने प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथरीच्या वतीनेत्यांचा पत्नीस दोन लाख रुपयांच्या धनादेश देण्यात आला.
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथरी येथे बँक मित्र म्हणून दीपरत्न वालदे हें ग्राहकांचा कामाला नेहमी धावून जात असतात असाच सल्ला व परिपूर्ण माहिती गणेशला देऊन त्यांचा कडून 30 ऑगस्ट 2023 पासून वार्षिक 436 रु. चा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढण्यात आलेला होता.
यादरम्यान गणेशला अल्पशा आजाराने मृत्यूनी कवटाळले परंतु त्यांनी काढलेल्या विम्या मुळे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथरीचा सौजन्याने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा अंतर्गत त्यांच्या पत्नीस एकूण दोन लाख रुपयेचा धनादेश देण्यात आला त्यामुळे त्यांच्या घरखर्चास आर्थिक पाठबळ मिळण्यास मदत झाली.
ही स्कीम शासनाने गोरगरिब नागरिकांसाठी काढलेली असून घरातील कर्ताधर्ता अचानकपणे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना आर्थिक संकटाच्या सामना करावा लागतो त्यामुळे या योजनाद्वारे घरातील व्यक्तींना आर्थिक पाठबळ मिळण्यास मदत होते.यावेळी धनादेश देतांना बँक ऑफ महाराष्ट्र पाथरी शाखेचे शाखा व्यवस्थापक मंगेश गणवीर,काजल घुमडे, अमरसेन मेश्राम, विठ्ठल सेडमाके,वैभव येरमे, दीपरत्न वालदे उपस्थित होते.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही 18 ते 50 वर्षाच्या वयोगटातील नागरिक काढू शकतात या स्कीमचा अंतर्गत दोन लाख रुपयाचा एक वर्षाच्या टर्म लाइफ कवर देण्यात येतो, यामध्ये ग्राहकांना वर्षाचे 436 रुपये जमा करावे लागतात असे मंगेश गणवीर,बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा व्यवस्थापक पाथरी यांनी माहिती दिली.