मुरखळा ता.जिल्हा गडचिरोली येथील कु.गणेश किशोर गडपल्लीवार बनला पोलीस उपनिरीक्षक ; एम.पी.एस.सी.तून भरारी.
एस.के.24 तास
गडचिरोली : गणेश हा मध्यम वर्गीय घरचा मुलगा असून लहानपना पासुन हुशार त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद उच्च.प्राथ . शाळा, मुरखडा येथे झाले. पदवीनंतर पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.2024 मध्ये त्याने गडचिरोली पोलिस दलात भर्ती झालं त्याच वर्षी त्याने स्पर्धा परीक्षा देऊन mpsc मंत्रालयीन क्लर्क झालं सध्या तो सोलापूर पीटीसी मध्ये पोलिस मूलभूत प्रशिक्षण घेत आहे.पण त्याचे लक्ष होते पोलिस उपनिरीक्षक.आणि ते गणेश ने मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यास करून साध्य केले आहे.
पोलीस प्रशिक्षण कठोर घेत असताना सुद्धा परस्थिती शी झुंज देऊन वेडात वेड काडून पण कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर यश नक्की मिळते हे गणेश एकाच वर्षात तीन शासकीय सेवेतील पद मिळवून सिद्ध केलं आहे. ग्रामीण भागातील तरुणासाठी गणेश एक आदर्श ठरला आहे.गणेश आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक, पाठीशी खंबीरपणे उभा असलेला मोठा भाऊ वहिनी बाबा आणि समस्त गडपल्लीवार मित्र परिवार यांना दिले आहे.
गणेश च्या यशाबद्दल मुरखडा परिसरात त्याचे कौतुक होत आहे.यशाबद्दल गोलेपल्लीवार परीवार व गावकरी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.