राजीव गांधी पंचायती राज संघटनची आदर्श गाव कळमना येथे भेट ; श्रमदान करीत घेतली विविध उपक्रमांची माहिती.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना हे नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच एक आदर्श गाव म्हणून ओळख असलेले गाव आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचार व संकल्पनेतून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून स्वच्छ सुंदर निर्मळ आणि पर्यावरण पूरक गाव निर्माण करण्यावर येथील उपक्रमशील, आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन परिश्रम घेतले आहेत. येथे अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
राजीव गांधी पंचायती राज संघटन जे काँग्रेस पक्षाचा आत्मा आहे. हे संघटन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाऊन काम करतेय. राजुरा येथे आयोजित दोन दिवसीय सर्वोदय संकल्प शिबिराचा भाग म्हणून या संपूर्ण शिबिरार्थ्यांनी कळमना गावाला भेट दिली. गावकऱ्यांनी सुध्दा अतिशय उत्स्फूर्तपणे या टिम चे गांधी टोपी, दुपट्टा, सुताची माळ, गुरुदेव भजन मंडळ व महीला नी लेझीम पथकाने अत्यंत साध्या पध्दतीने स्वागत केले.
या टिम ने गावात श्रमदान करुन येथे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. गावातील स्वच्छता, पर्यावरण पूरक वातावरण, सुरक्षा च्या बाबतीत केलेले काम, आदर्श शाळा व गुरुजन गावातील जनसमुदायाच प्रेम भावना बघुन सगळी टीम भाराऊन गेली व त्यांनी इतक स्वच्छ सुंदर निर्मळ मार्डन ग्राम आम्हाला बघायला मिळाल यांचा आनंद व्यक्त केला.
यावेळी राजीव गांधी पंचायती राज संघटन चे राष्ट्रीय महासचिव दिपकभाई ठाकुर , राष्ट्रीय महासचिव नारायणभाई राठोड, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे, राष्ट्रीय सचिव गीता कळवे, जिल्हाध्यक्ष रवी खोफरे (एम. पी), चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बंडु धोतरे, तालुकाध्यक्ष विजय गावंडे, शहराध्यक्ष जयंत घोडे, सरपंच लोकनाथ रामटेके, विलास पिसे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, ग्रामसेवक सिताराम मरापे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष महादेव ताजणे, सचिव दत्ताजी पिंपळशेंडे, सुरेश गौरकार, विठ्ठल वाढई, कवडु पिंगे, लटारी बल्की यासह अनेक मान्यवर तथा गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, बचतगट महीला, कळमना येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नारायणभाई राठोड यांनी कळमना हे गाव शहरांपेक्षा ही फार स्वच्छ सुंदर निर्मळ मार्डन आहे. सरपंच नंदकिशोर वाढई यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतून गावकऱ्यांच्या सहकार्याने आदर्श गाव घडवलं. आम्ही सुध्दा अशाच प्रकारे प्रत्येक गाव, शहर असे आदर्श निर्माण झाले पाहिजेत म्हणून प्रयत्न करतो आहे.
निश्चितपणे या गावाची महती, किर्ती आम्ही संपूर्ण देशात सांगू, पुन्हा एकदा कळमना येथे नक्की भेट देऊ असे आश्वासन दिले. तर संजय ठाकरे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम बघुन आम्ही भारावून गेलो अशी प्रतिक्रिया दिली. सरपंच नंदकिशोर वाढई व गावकऱ्यांचे अभिनंदन केले.