जि.प.प्राथमिक शाळा जांब रयतवारी येथे बालआनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.
32 पटसंख्या व 2 वर्षांपासून शाळेत 1 पद रिक्त,मुख्याध्यापक,गिरीधर कांबळे गावकऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम झाला संपन्न.
एस.के.24 तास
सावली : अवघी 32 पटसंख्या व दोन वर्षांपासून शाळेत एक पद रिक्त अश्या अवघड परिस्थितीतही प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांच्या व गावाच्या सहकार्याने सुंदर व अप्रतिम कार्यक्रम घेता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जांब रयतवारी शाळा.जंगलात वसलेले अवघे 133 कुटुंब असलेल्या जांब रयतवारी शाळेत 7 मार्च ला जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला बालआनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
बालआनंद मेळाव्याचे उदघाटन सरपंच सौ सरला कोटंगले यांनी केले.. सहउदघाटक म्हणून श्री.नरेश बाबनवाडे उपसरपंच कोंडेखल हे होते तर अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.खुशाल पाटील हुलके हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सर्व ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य होते.बालआनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पदार्थ बनवून आणले. गावकर्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.यातून खरी कमाई चि संकल्पना रुजविण्यात आली...नंतर गावातील महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात संगीत खुर्ची... मैदानी खेळ घेण्यात आले...सायंकाळी विजेत्यांना बक्षीस देण्यात आले..
सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.उदघाटन मा श्री अशोक पाटील चौधरी पोलीस पाटील यांचे हस्ते करण्यात आले... प्रमुख पाहुणे म्हणून श्री उमाकांत पा चरडूके पो पा जांब बुज.भास्कर पा धानफोले माजी उपसरपंच जांब बुज संजय पा पाल माजी अध्यक्ष शाळा समिती जांब.
उत्तम पा जुमनाके माजी ग्रा प सदस्य.भास्कर पा ठाकूर अध्यक्ष से स संस्था जांब बुज श्रीकृष्ण पा बोदलकर.ग्रा प सदस्य सौ प्रियांकाताई हुलके ग्रा प सदस्या व सर्व सत्कारमूर्ती उपस्थित होते... कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री खुशाल पा हुलके अध्यक्ष शा व्य स हे होते
या कार्यक्रमात ह भ प वनिताताई दुपारे.श्री मनोज शेरकी सर. श्री कन्नमवार सर श्री बोदलकर सर. श्री जिल्हेवार सर.श्री खोब्रागडे सर...श्री धकाते सर श्री वाढणकर सर श्री मडावी सर श्री अवसरे सर श्री बारसागडे सर तसेच गावातून नोकरीला लागलेले श्री धनराज कोहळे सर श्री.देवानंद नैताम सर श्री.आशिष सोनटक्के लिपिक CDCC श्री.शरद भुरसे msf यांचा सत्कार करण्यात आला.
पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिक्षणाचे महत्व सांगून शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली...सर्व विद्यार्थी व शाळेचे कौतुक केले.कमी मनुष्यबळ असूनही इतक्या कमी वेळेत इतक्या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबाबत मुख्याध्यापक व गावकऱ्यांचे कौतुक केले याप्रसंगी विविध अश्या नृत्यांची.
नकलांची मेजवानी गावाला अनुभवयास मिळाली.एकापेक्षा सरस असे नृत्य गायन व कलाविष्करांनी श्रोत्यांचे देहभान हरपले.अतिशय भव्यदिव्य अश्या या कार्यक्रमाचे संचालन नवनाथ वासेकर व प्रफुल चुनारकर सर यांनी केले प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.गिरीधर कांबळे यांनी केले तर आभार श्री आशिष सोनटक्के यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व गावकर्यांनी अतोनात मेहनत घेतली.सर्व गावकऱ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री.कांबळे सर यांनी आभार मानले असून सर्व श्रेय शाळेतील बालगोपालांना समर्पित केले आहे.