अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीस्वाराचा जागीच मृत्यू.

अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीस्वाराचा जागीच मृत्यू.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपुरी : दिनांक,२५/०३/२५ ब्रम्हपुरी तालुक्यातील  पिंपळगाव(भोसले )शिवाजी चौक येथील रहिवाशी वसंतरावजी मिसार यांचे मोठे चिरंजीव राजू उर्फ राहुल मिसार वय, 38 वर्ष यांचे काल दि.24/03/2025 ला सायंकाळी 7:00 वाजे दरम्यान लाखांदूर च्या समोर सावरगांव फाट्या जवळ अपघाताने जागीच मृत्यू झाला.


राहुल लाखांदूर तालुक्यातील आतली येथे सासुरवाडी ला साळीच्या लग्ना करिता पिंपळगाव वरून गेला होता.दिनांक,25/03/2025 मंगळवारला साळीचे लग्न असल्यामुळे तो हळदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजेच 24 ला आतली वरून काही कामानिमित्याने लाखांदूर ला स्कुटीने जात असता अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कुटीला धडक दिली.त्यात तो जागीच ठार झाला.

 

घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि प्रेत शवविच्छेदनासाठी लाखांदूर शासकीय रुग्णालयात  पाठविला.धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध व पुढील चौकशी लाखांदूर पोलीस करीत आहेत.


अंतिम संस्कार आज पिंपळगाव भोसले स्मशानभूमीत होणार आहे.त्यांच्या पश्चाताप पत्नी व चार वर्षाची मुलगी आहे.राजू उर्फ राहुल च्या अपघाती निधनाने सासुरवाडी आतली व पिंपळगांव (भोसले) येथे शोककळा पसरली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !