ने.हि.महाविद्यालयात महिलोन्नतीवर पथनाट्य
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१०/०३/२५ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय व शांताबाई भैया महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने एनसीसी युनिट,रेड रिबीन क्लब,गर्ल्स वेल्फेअर कमिटीच्या वतीने प्राचार्य डॉ डी एच गहाणें यांच्या मार्गदर्शनाखाली महिलोन्नतीवर उत्कृष्ट नुक्कड नाटीका/पथनाट्य घेऊन विद्यार्थ्यांना महिला कशी सक्षम आहे, महिलांसाठी शासनाच्या विविध योजना, अन्यायाविरुद्ध महिलांनी आवाज कसा उठवला पाहिजे आणि महिला सुरक्षित कशी राहील यावर पथनाट्याद्वारे प्रबोधन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर,डॉ.रेखा मेश्राम,डॉ.धनराज खानोरकर, डॉ कुलजित शर्मा,डॉ.विवेक नागभिडकर,डॉ. अजित खाजगीवाले,प्रा सोनाली पारधी व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी उपप्राचार्य डॉ.सुभाष शेकोकरांनी पथनाटय प्रक्रियेबद्दल आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ कुलजित शर्मा तर संचालन व आभार डॉ पद्माकर वानखडेंनी मानले.यानंतर पथनाट्य ब्रह्मपुरी शहरातील मुख्य चौकात सादर करण्यात आले.