जिच्या हाती ज्ञान,तंत्रज्ञान आणि विज्ञानाची दोरी ती जगाला उद्धारी. - डॉ.स्निग्धा कांबळे

जिच्या हाती ज्ञान,तंत्रज्ञान आणि विज्ञानाची दोरी ती जगाला उद्धारी. - डॉ.स्निग्धा कांबळे


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपूरी -०८/०३/२५ महिला सशक्तीकरण हे केवळ भाषणापुरते मर्यादित न राहता ते कृतीत आणणे अत्यावश्यक आहे.  वंश परंपरेने तिच्या हातात पाळण्याची दोरी देऊन चूल आणि मूल एवढेच तिचे कार्यक्षेत्र अधोरेखित केले होते मात्र आज ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या माध्यमातून महिलांनी आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. ज्या महिलांच्या हातात ही तिन्ही क्षेत्रे आहेत, त्या केवळ स्वतःचं नाही तर संपूर्ण समाजाचा विकास करू शकतात.  



स्त्रीवाद हा संघर्षाचा विचार न राहता, समाजसुधारणेचा आणि समानतेचा विचार असला पाहिजे  असे प्रतिपादन डॉ. स्निग्धा कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी येथील महिला अध्ययन केंद्र, महिला तक्रार निवारण कक्ष आणि समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  करण्यात आले होते. 

        

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था, चांदाच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. स्निग्धा  कांबळे होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका के . सी. मोटघरे आणि अँड.ज्युली मेश्राम वडसा  विचार मंचावर उपस्थित होते. 

           

के.सी. मोटघरे मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनात स्त्रियांशी संबंधित महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला. त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचार मांडले.

         

अँड.ज्युली मेश्राम यांनी आपल्या संबोधनात  महिलांना सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक आणि राजकीय समानता मिळावी यासाठी भारतीय संविधानात अंतर्भूत असलेल्या  विविध कलमांची सविस्तर माहिती दिली आणि स्त्रियांवर होणारे अन्याय, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या समस्यांविरुद्ध  त्यांनी आवाज उठवावा असे आवाहन करून स्त्रीने देखील तिच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याचा दुरुपयोग करुन पुरुषाचा छळ करने टाळावे असे प्रतिपादन केले. 

     

या प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षणसंस्था चांदा द्वारा संचालित विविध शाखात कार्यरत महिला कर्मचारी एकता ताई, अहिल्या ताई गजभिये, सश्मिता ताई, कोमल ताई, शीलाताई पानसे,कल्पना निमगडे यांचा सत्कार करण्यात आला.पुणे येथील आर्मी डे परेडसाठी निवड झालेल्या महाविद्यालयातील वैष्णवी मेश्राम या विद्यार्थिनीचा यांप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.

          

या प्रसंगी प्रतिकूल परिस्थितीशी लढा देऊन स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा ज्यांनी उमटविला परंतु व्यवस्थेने त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही अशा ब्रम्हपुरी परिसरातील संतोशी मोटघरे, गीता समर्थ, नंदाताई मेश्राम, शमशाद पठाण,ममता बोरकर,माधुरी तुंगीडवार, सुनीता गुंजेकर,अनीता मेश्राम या महिलाचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करुन गौरविण्यात आले .

      

या प्रसंगीमहाविद्यालयातील यश शेंडे,लक्ष्मी उरकुडे, अनिकेत महाजन,पृथ्वीराज बोरकर,शुभांगी श्रीरंग, सिद्धेश्वर भोयर,पायल कृष्णापुरकर,वेणू राऊत या विद्यार्थ्यांनी महिला सशक्तीकरणावर आपले विचार आणि कविता सादर केल्या.

         

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी घरडे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.भीमादेवी डांगे यांनी तर आभार हर्षाली बनकर यांनी मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !