रानटी डुक्कर व ससा शिकार प्रकरनातील मुख्य आरोपी दीड वर्षापासून फरार असलेले सावली वनपरिक्षेत्राचे पथकाने सिनेस्टाईलने पकडले.

रानटी डुक्कर व ससा शिकार प्रकरनातील मुख्य आरोपी दीड वर्षापासून फरार असलेले सावली वनपरिक्षेत्राचे पथकाने सिनेस्टाईलने पकडले.


एस.के.24 तास


सावली : वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत नोंद वनगुन्हा क्रमांक.09220/230485 दि. 13/08/2023 अन्वये वन्यप्राणी रानटी डुक्कर व ससा शिकार प्रकरनातील मुख्य आरोपी घटना दिनांक 13 ऑगस्ट 2023 पासून फरार असलेले राजेंद्रसिंग जरनेलसिंग बावरी वय,30 वर्ष रा.मुडझा त.ब्रह्मपुरी जी.चंद्रपूर यांना मुडझा येथून 


व शत्रूगन वसंत महाडोळे वय,32 वर्ष रा.बल्लारपूर पो.मुडझा त.ब्रह्मपुरी जी.चंद्रपूर यांना बामणी तालुका जिल्हा गडचिरोली येथून आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी सावली वनपरिक्षेत्राचे पथकाने सिने स्टाईल पकडण्याची कारवाई केली.


सदरची कारवाई विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांच्या नेतृत्वात नंदकिशोर पाटील,क्षेत्र सहाय्यक पाथरी,सुरेंद्र सिंग वाकडोत क्षेत्र सहाय्यक राजोली,रवी सूर्यवंशी क्षेत्र सहाय्यक व्याहाड आणि वनरक्षक सिरसी,महादेव मुंडे, खेमराज गोडशेलवार,वनरक्षक पाथरी,श्रीराम आदे,वनरक्षक राजोली,एकनाथ खुडे,वनरक्षक गायडोंगरी व अतिन मानकर,लिपिक घनश्याम बन्सोड,किशोर काटपलीवार वाहन चालक,नागेश बद्दमवार PRT बोथली यांनी यशस्वी रित्या पार पाडली. 


पुढील तपास प्रशांत खाडे विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली हे करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !