ग्रामपंचायत कार्यालय,अ-हेरनवरगांव येथे जागतिक महिला दिन साजरा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,०९/०३/२५ अ-हेरनवरगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ग्रामपंचायत सरपंचा सौ.दामिनी चौधरी यांनी प्रमुख अतिथी रतिराम चौधरी सचिव, अंगणवाडी सेविका मंदाताई वासनिक, हेमलता उरकुडे, वैशाली ढोरे,आशा वर्कर वंदना मेश्राम, रिया जनबंधू, यांच्या उपस्थितीत माता रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व रण रागिनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा वर्कर नयना क-हाडे, गीता वकेकार,अंगणवाडी सेविका हेमलता उरकुडे, वनमाला वकेकार, नवनीता ठेंगरे,भारती सोनवाणे, ग्रामपंचायत सदस्या सुनिता मडावी,दिगांबर ठेंगरे,शैलेश क-हाडे,सुरज टेंभुर्णे यांनी मोलाचे सहकार्य केले.