सावली तालुक्यातील चांदली (बुज) येथील मेंढपाळ निलेश कोरेवार वाघाच्या हल्ल्यात ठार.
एस.के.24 तास
मुल : मुल तालुक्यातील एमआयडीसी परिसरात शेळ्या मेंढ्याच्या कळपावर हल्ला करीत मेंढपाळ निलेश दुर्गा कोरेवार रा.चांदली बुज.ता.सावली यास ठार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली
मुल तालुक्यातील चिमढा शेतशिवारात केलझरकर यांचे शेतात शेळ्या मेंढ्याचा कळप मुक्कामी होता.निलेश कोरेवार व योगेश कोरेवार हे दोघेही भाऊ सोबत असतांना रात्रौ 11.30 च्या दरम्यान वाघाने हल्ला करून निलेश याला परकटत नेले.
याबाबतची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांना देण्यात आली असता पथकासह शोधमोहीम सुरु केली.शोधमोहिमेदरम्यान राजुरी कपंनीच्या मागील जंगलात मृतदेह आढळले.यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी आसपास च्या गावकऱ्यांनी केली.