माजी सैनिक तथा पोलीस कॉन्स्टेबल,जयप्रकाश राऊत यांचे निधन.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक
ब्रम्हपुरी दिनांक,३१/०३/२५ माजी सैनिक तथा पोलीस कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन आरमोरी येथे कार्यरत असलेले जयप्रकाश राऊत यांचे ब्रम्हपुरी येथिल नागेश्वर नगर निवासी दीर्घ आजाराने दि.३० मार्चला रात्रो ३ -०० वाजताच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.
त्यांच्यावर आज दि.३१/०३/२०२५ला दुपारच्या सुमारास स्मशानभूमी भुतीनाला ब्रम्हपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.ते मनमिळावू स्वभावाचे होते, त्यांनी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती झाले होते.त्यांनी आपली नोकरी प्रामाणिक पणे केली. त्यांच्या मृत्युने कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
त्यांच्या पच्छात्य पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा आप्त परिवार आहे.यावेळी पोलीस विभागांचे अधिकारी, कर्मचारी व ब्रम्हपुरी तालुका माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, नातेवाईक तसेच नागेश्वर नगर वासिय बहुसंख्येने उपस्थित होते.