पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग विठ्ठल रुक्मिणी सभागृहात संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी - २६/०३/२५ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी निमित्ताने संस्कार भारती ब्रह्मपुरी शाखेच्या वतीने अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग संपन्न झाला.नागपूर येथील अ.भा. संस्कार भारतीच्या नाट्यविधा प्रमुख दिपाली घोंगे यांनी हा एकपात्री प्रयोग सादर केला.
आपल्या अभिनयाने दिपाली घोंगेनी जवळपास एक तास प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.स्थानिक विठ्ठल रुक्मिणी सभागृहात आयोजित याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी गो.वा.महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ.सौ.विशाखा कायदे तर प्रमुख अतिथी सौ.भाग्यश्री देशकर या होत्या.
या कार्यक्रम प्रसंगी सौ.दीपाली घोंगे यांनी देवी अहिल्याबाईंचा पूर्ण जीवनपट उलगडून सादर केला. प्रारंभी अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक परिचय व आभारप्रदर्शन सौ.अर्चना नंदूरकर यांनी केले.