राजुरा तालुक्यातील कळमना येथे महिला दिनानिमित्त सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते बहीणींचा सत्कार.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजुरा तालुक्यातील आदर्श गाव तसेच एक उपक्रमशील स्मार्ट गाव म्हणून ओळख असलेल्या कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गावातील महिलांचा ग्रामपंचायत कळमना च्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यामध्ये अल्काताई रत्नाकर गेडाम यांचा सरपंचाच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर कळमना येथील घरा समोरील व आजुबाजूचा परिसर स्वच्छ सुंदर निर्मळ ठेवणाऱ्या उत्कृष्ट अशा महिलांना आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांचा हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यात संगीता महादेव ताजणे, सुनिता सुरेश गौरकार, सुनिता राजु भोयर, वैशाली गणेश आस्वले आदींचा समावेश होता.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गावातील सामाजिक, सांस्कृतिक व विविध सेवा करणाऱ्या बहीणीचा सत्कार करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. गावातील महिलांनी ठरविले तर गाव स्वच्छ, सुंदर आणि विकासित होण्यास मदत होईल. आपल्या घरी आनंदाचे झाड लावा, तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशी भावना बोलून दाखवली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे ग्रामपंचायत सदस्य तथा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रंजना दिवाकर पिंगे, विशेष अतिथी पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, उपसरपंच कौशल्या मनोहर कावळे, ग्रामपंचायत सदस्य सुनिता ऋषी उमाटे, मुख्याध्यापिका बेबीनंदा दुधे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रावण गेडाम, सदस्य रामचंद्र कुकुडे, कवडु पाटील गौरकार
सुरेश आत्राम मंगेश क्षिरसागर,गुरूदेव सेवा मंडळाचे सचिव दत्ताजी पिंपळशेंडे,शाळेचे शिक्षक दिलीप निमकर,शालीक पेंदोर,लता क्षिरसागर, संगीता उमाटे,सुचिता धांडे,कल्पना क्षिरसागर यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनिता गौखरे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शालीक पेंदोर सर यांनी मानले.