भामरागड तालुक्यातील जुवी या अतिदुर्गम गावात नक्षलवाद्यांकडून आदिवासीची गळा दाबून हत्या.

भामरागड तालुक्यातील जुवी या अतिदुर्गम गावात नक्षलवाद्यांकडून आदिवासीची गळा दाबून हत्या.


एस.के.24 तास 


भामरागड : भामरागड तालुक्यातील जुवी या अतिदुर्गम गावात नक्षलवाद्यांनी एका निरपराध आदिवासी वृद्धाची 29 मार्च रोजी मध्यरात्री गळा दाबून हत्या केली.30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या सकाळी ही घटना उजेडात आली. 


पुसू गिबा पुंगाटी वय,60 वर्ष असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोन महिन्यांत नक्षल्यांनी दोन हत्या केल्याने भामरागड मध्ये पुन्हा एकदा नक्षल्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, 29 रोजी रात्री पुसू पुंगाटी कुटुंबासह घरी होते.मध्यरात्री च्या सुमारास चार नक्षलवाद्यांनी घराच्या दरवाजावर थाप मारली. कुटुंबीयांनी दरवाजा उघडला असता पुसू यांच्याकडे काम आहे असे सांगून त्यांना ते सोबत घेऊन गेले.गावालगत च्या जंगलात पुसू पुंगाटी यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. 

30 रोजी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी नक्षल पत्रक किंवा पोस्टर आढळून आले नाही.त्यांचा मृतदेह भामरागड येथील रुग्णालयात आणण्यात आला आहे.पोलिसांचा खबरी असल्याचा संशयातून ही हत्या केली असावी,असा संशय व्यक्त केला जात आहे. 

पोलिसांनी ते खबरी असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे,असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

महिनाभरापूर्वी माजी सभापतींची हत्या : -

1 फेब्रुवारी ला भामरागड चे माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी (रा.कियर) यांची हत्या करून नक्षल्यांनी मृतदेहाजवळ पत्रक टाकले होते.दोन महिन्यांत दुसरा खून झाल्याने या भागात नक्षली सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 

छत्तीसगड सीमेवरून गडचिरोलीत प्रवेश करणाऱ्या माओवाद्यांची पोलिसांनी सीमावर्ती भागात पोलिस ठाणे सुरू करून कोंडी केली आहे.चालू वर्षी भामरागड तालुक्यात छत्तीसगड सीमेवर पेनगुंडा, नेलगुंडा व कवंडे येथे पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नक्षलवादी बिथरले आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !