संतोषसिंह रावत मित्र परिवाराने जुनासुर्ला गाववासीय जनतेची भागविली तहान.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : उन्हाळ्याच्या दिवसाला सुरवात झाली असून नेमकाच उन्हाळा तापायला सुरवात होत असून नदी नाले विहीर कूपनलिका यांच्या पाण्याची पातळी खोलवर जात आहे.त्यामुळे मानवाला व जनावरांना पाण्याची तीव्रता जाणवू लागली आहे.
अशाच मुल तालुक्यातील मौजा जूनासूर्ला येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार म्हणून जुनासुरला येथील ग्रामस्थानी आणि काँग्रेस पदाधिकारी यांनी काँग्रेसचे नेते, सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प. अध्यक्ष,संतोषसिंह रावत यांच्याकडे याबाबत आमच्या गावाला पाण्याच्या दुष्काळामुळे बोरर्व्हेलची (कूपनलिका) ची नितांत गरज असल्याचे सांगितले असता जुनासुर्ला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी
संतोष सिंह रावत मित्र परिवार यांच्या मध्यस्थीने स्वनिधीतून जुनासुरला येथील वॉर्ड नंबर १ मध्ये तत्काळ दोन बोरव्हेल खोदून दिल्याने भविष्यात जाणवणारी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसात जुनासुरला वाशीय गावकऱ्यांची तहान भागल्याने जुनासुर्ला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी संतोष सिंह रावत मित्र परिवाराच्या मनःपूर्वक जाहीर आभार मानले आहे.
दोन बोअरवेलचे खोदकाम करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा काँग्रेसचे महासचिव राकेश रत्नावार,माजी सभापती तथा संचालक व जिल्हा काँग्रेस महासचिव घनशाम येनूरकर, ग्राम पंचायत सरपंच रंजित समर्थ, सामाजिक कार्यकर्ते ग्रामीण काँग्रेस नेते राजू पाटील मारकवार,
कृषी बाजार समितीचे माजी संचालक विनायकराव बुग्गावार,सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष गणेश खोब्रागडे,सदस्य विठलभाऊ इंगोले,रामूजी कोरीवार,बिराजी कंकलवार, मूरलीधर लोडेलीवार जुनासुरला येथील महिला व अनेक नागरिक उपस्थित होते.