अ-हेरनवरगांव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती व शिव भोजन कार्यक्रम संपन्न. लोकराजे शिवरायांचा शिवधर्म हा लोकहितासाठीचा शिवजयंती उत्सव. - डॉ.धनराज खानोरकर.

अ-हेरनवरगांव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती व शिव भोजन कार्यक्रम संपन्न.


लोकराजे शिवरायांचा शिवधर्म हा लोकहितासाठीचा शिवजयंती उत्सव. - डॉ.धनराज खानोरकर.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगांव येथे शिवजयंती उत्सव समिती च्या वतीने तिथीनुसार दि.१७ मार्च२५ ला श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, शिवभोजन व रामपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम शांततेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


या कार्यक्रमाचे उद्घाटन  क्रिष्णा सहारे /मोटू पिलारे  यांनी  विलास उरकुडे  यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्राध्या. धनराज खानोरकर,डॉ.प्राध्या.मोहन कापगते, प्राध्या. संजय मगर,प्रमुख अतिथी  बि-हाड कादंबरीकार अशोक पवार,जितेंद्र क-हाडे उपसरपंच, सतीश ठेंगरे,वामनराव मिसार, सुभाष ठेंगरे,नकटु ठवरे,वैशाली लोखंडे


सौ खरकाटे मॅडम ,ऋषी कुमार ठेंगरे यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलनाने प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. उपस्थित अतिथींनी सुद्धा प्रतिमेला माल्यार्पण  करून अभिवादन केले.


कार्यक्रमाच्या पाहुण्यांचे स्वागत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनमोहक नृत्याने करण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अ-हेरनवरगांव येथील शिक्षक सोमेश्वर खरकाटे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सपत्नीक मान्यवरांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.


शिवजयंती निमित्य शालेय विद्यार्थ्यांच्या रांगोळी ,भाषण, गीत,पोवाडे स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना  अॅड हेमंत उरकुडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रांगोळी - मोनिका ठवरे 

भाषण - कन्हैया सहारे

पोवाडा - किर्ती तुपट.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना ..


" छत्रपती शिवाजीराजे हे खरे रयतेचे राजे होते.त्यांनी स्वतंत्र राज्य आपल्या बळावर निर्माण केले.ते रयतेतील प्रत्येक घटकांची नितांत काळजी घेत असत.हा राजा आपले मनातले करतो आहे,असे सा-या रयतेला वाटे.याच कारणाने रयत त्यांच्यासाठी प्राणाचे बलिदान द्यायला तयार होती कारण लोकराजे शिवरायांचा शिवधर्म हा लोकहितासाठीचा होता " असे मार्मिक विवेचन कवी डॉ धनराज खानोरकरांनी केले ते शिवाजी जयंतीनिमित्त अ-हेर नवरगांव येथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.


तसेच प्राध्या.मोहन कापगते यांनी सुद्धा शिवरायांच्या अनमोल इतिहासाची पाने व प्रसंगाची दृश्य जनतेच्या नजरेसमोर शब्द शैलीने ठेवली.संजय मगर,मोंटू पिलारे,क्रिष्णा सहारे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.


कार्यक्रमानंतर गावातील जनतेसाठी शिव भोजन व रात्रो पंकज पाल महाराज यांच्या समाज प्रबोधनापर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

 

कवी अमरदीप लोखंडे यांनी  पाहुण्यांचा परिचय, कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संचालन विनित ठेंगरे आभार वामन मिसार यांनी उपस्थितांचे मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजू ढोरे, मुन्ना टेंभुरकर  , एकनाथ उरकुडे व शिवजयंती उत्सव समिती पदाधिकारी, उत्साही नवतरुण यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम शांततेत पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !